Drowning death Pudhari
बेळगाव

Drowning Death: बेळगावचा डॉक्टर ‌‘तिलारी‌’त बुडाला

मित्रांसमवेत फिरायला गेलेला शाहूनगर येथील तरुण तिलारी धरणात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मित्रांसमवेत फिरायला गेलेला शाहूनगर येथील तरुण तिलारी धरणात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. महम्मद अमीरशा (वय 26, रा. शाहून नगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

अधिक माहिती अशी की, महम्मदने दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. शनिवारी तो काही मित्रांसमवेत तिलारी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. धरणात तो पोहण्यासाठी उतरला असता तो बुडाल्याचे त्याच्या मित्रांनी व प्रत्यदर्शीनी सांगितले.

ही माहिती वडगाव पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली; परंतु अंधार पडल्याने बुडालेल्या तरुणाचा शोध घेणे कठीण झाले. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT