Buffalo Milk Production 
बेळगाव

Buffalo Milk Production : म्हैस दूध उत्पादनात बेळगाव जिल्‍हा अग्रेसर

उत्तर कर्नाटक उत्पादनात आघाडीवर : गाय दूध उत्पादनात बळ्ळारी अव्वल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. दूध उत्पादनात बेळगाव जिल्हा अव्वल असून रोज ५४ हजार ३०८ कि. ग्रॅ. दुधाचे संकलन करण्यात येते. तर गायीच्या उत्पादनात बळ्ळारी जिल्हा अग्रेसर आहे. त्याठिकाणी रोज २ लाख, ५८ हजार, ४०५ कि. दुधाचे संकलन होते.

केवळ शेती व्यवसायावर अवलंबून राहणे शेतकऱ्यांना अवघड आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन व्यवसायाला प्राधान्य देतात. दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून रोजचा खर्च भागवण्यात येतो. अलीकडे शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. दुष्काळ, कोसळणारे शेती उत्पादनांचे दर, उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

परिणामी पशुसंगोपन व्यवसाय वाढत चालला आहे. म्हैशी, गायींचे पालन शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. राज्यात १६ दूध उत्पादक संघ कार्यरत आहेत. उत्तर कर्नाटकात बेळगाव, धारवाड, विजापूर, हावेरी त्याचबरोबर कल्याण कर्नाटकातील गुलबर्गा, बळ्ळारी परिसरात दुधाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. परंतु बेळगाव परिसरातील म्हैशींच्या दुधाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे.

म्हैस दुधाला मागणी

म्हैशींच्या दुधामध्ये गायीच्या दुधाच्या तुलनेत अधिक फॅट असते. त्यामुळे तूप, लोणी, पनीर, पेढा, खवा, दही उत्पादनासाठी म्हैशींच्या दुधांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. म्हैशीच्या दुधाला अधिक दर मिळतो. यामुळे म्हैस संगोपनाला अधिक प्राधान्य मिळते.

बेळगाव अव्वल

दुष्काळाचा फटका यावर्षी दुग्ध व्यवसायाला बसत आहे. दुधाचे उत्पादन कमी होत आहे. राज्यातील १६ दूध संघातर्फे रोज १ कोटी, ७ लाख, ३८ हजार, ३६० कि. ग्रॅ. दुधाचे संकलन करण्यात येते. यामध्ये म्हैशीचे दूध ९३,७६६ कि.ग्रॅ., गायीचे १,०६,४४,५९४ कि. ग्रॅ. दूध संकलन करण्यात येते. बेळगाव दूध संघातर्फे ५४,३०८ कि. धारवाड १४,१५० कि., विजापूर ११,०६४ कि. म्हैशीचे दूध संकलन होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT