KYC Pudhari
बेळगाव

Belgaum cylinder KYC scam| सिलिंडर केवायसी : लाखोंची फसवणूक

एपीके फाईल पाठवून चोरली बँक खात्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : एकीकडे एलपीजी सिलिंडरचा तुटवडा आहे, तर दुसरीकडे बुकिंग करूनही गॅस मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी गॅस सिलिंडरसाठी केवायसी (ग्राहक माहिती) अद्यवायत करण्याच्या बहाण्याने दोघांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

उडपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ‌‘आम्ही एका गॅस एजन्सीमधून बोलत आहोत‌’, असे सांगत अनोळखी नंबरवरून फोन करून भामट्यांनी दोन ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या व्हॉटस्‌‍ॲपवर एक एपीके फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. फाईल डाऊनलोड होत असताना ग्राहकांचे फोन हॅक झाले आणि भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यांचे तपशील मिळवून खात्यातून पैसे चोरले. एका खात्यातून दीड लाख, तर दुसऱ्या खात्यातून सहा लाख रुपये परस्पर वळवण्यात आले.

पैसे काढले गेल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतरच फसवणूक उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. उडपीचे पोलिस अधीक्षक हरिराम शंकर यांनी सांगितले की, या फसवणुकीबाबत माहिती दिली असून, लोकांनी सतर्क राहावे. सिलिंडर जुन्या दराने दिला जाईल. केवायसीसाठी घाई करण्याची गरज नाही. सरकारने कोणताही नवीन आदेश जारी केलेला नाही. पूर्वीचा आदेश अजूनही लागू आहे. जनतेने जागरूक राहावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT