मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये बुधवारी (दि.14) मध्यरात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.  
बेळगाव

बेळगाव : महावीर कॉलनीत सिलेंडरचा स्फोट, घर जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये बुधवारी (दि.14) मध्यरात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्यामुळे जीवित हानी टळली.

मजूर म्हणून काम करून शेडमध्ये राहणारे चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विठ्ठल लमाणी यांनी मजूर म्हणून जमा केलेले 1 लाख 80 हजार रोख व 35 ग्रॅम सोने जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. माळमारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT