Crime News Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Crime: शिरूरजवळ अपघात भासवून युवकाचा खून?

खिळेगाव (ता. अथणी) येथील एका युवकाचा खून करून अपघात भासविल्‍याचा आरोप नातेवाईकांतून करण्‍यात आला

पुढारी वृत्तसेवा

अथणी : खिळेगाव (ता. अथणी) येथील एका युवकाचा खून करून अपघात भासविल्‍याचा आरोप नातेवाईकांतून करण्‍यात आला आहे. चंद्रकांत गंगप्‍पा शिवपुजी (वय ४५) असे त्‍याचे नाव आहे. तो रविवारी सकाळी दुचाकीवरून ऐनापूरला काविळीवरील औषध आणण्यासाठी जातो म्हणून बाहेर पडला होता. शिरूर गावाजवळ त्‍याच्‍या दुचाकीला अपघात होउन तो ठार झाला. मात्र, सदर अपघात नसून त्‍याचा खून झाल्‍याचा संशय व्यक्त करण्‍यात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, चंदक्रांत रविवारी शिरूर- आरळहट्टी मार्गाने ऐनापूला जात असताना शिरूर गावाजवळ त्‍याच्‍या दुचाकीचा अपघात झाला. मात्र, अपघात भासवून त्याचा खून केला असल्‍याचा संशय व्यक्त होत आहे. परंतु नेमका खून आहे की अपघात, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनास्थळी अतिरिक्त पोलिसप्रमुख आर. बी. बसर्गी, डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. मृताच्‍या नातेवाईकांनी हा अपघात नसून त्‍याचा खून करण्‍यात आला आहे, असे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी अथणी पोलिस स्‍थानकात नोंद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT