Knife Attack Pudhari
बेळगाव

Belgaum Crime: कडोलीत माय-लेकावर दहाजणांचा हल्ला

सासरच्या लोकांचे कृत्य : जावयावर चाकूने वार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आपली पत्नी व मुलाला पाहण्यासाठी गेलेल्या तरुणासह त्याच्या आईवर सासरच्या लोकांनी हल्ला केला. एकाने तरुणावर चाकूने वार केल्याने तो जखमी झाला.

सैफअली नूरअहमंद मुजावर व त्याची आई नसीमा नूरअहंमद मुजावर (दोघेही रा. शिवाजी गल्ली, पिरनवाडी) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात समीर धामणेकर, अमन इस्माईल, रेहान, मुजाहिद, अस्मा धामणेकर, महबुबी रफिक धामणेकर, आयेशा व अन्य दोघे असे दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्याददादर सैफअली याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी व आई दोघेजण पत्नी व मुलाला भेटण्यासाठी सासरवाडी कडोलीत गेलो होते. यावेळी पत्नी व अन्य संशयिताने क्षुल्लक कारणावरुन भांडण काढले. यानंतर अर्वाच्च शिवीगाळ करत मारबडव सुरु केली. अमनने माझ्यावर चाकूने हल्ला करत जखमी केले. आईलाही धक्काबुक्की केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी नोंद करुन घेतली असून निरक्षक सुरेश शिंगे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT