Arrest Pudhari
बेळगाव

Belgaum Crime: आयपीएल बेटिंग, मटका, गांजाविरोधात धडक कारवाई

सात जणांना अटक; मोबाईल, रक्कम, जुगार साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी धडक कारवाया करत ऑनलाईन आयपीएल सट्टेबाजी, मटका जुगार आणि सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवून सात जणांना अटक केली आहे. कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल फोन आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

टिळकवाडी पोलिसांनी व्हॅक्सीन डेपो परिसरात छापा टाकून आयपीएल क्रिकेट बेटिंग करणाऱ्या यादव कॉलनीतील व्यावसायिक विशाल नागोजी पाटील (वय २८) याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचा ॲपल मोबाईल आणि ५ हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली. तपासादरम्यान रोहाना नावाचा आणखी एक आरोपी या सट्टेबाजी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले असून, त्याचा शोध सुरू आहे.

मटका जुगाराविरोधातील कारवाईत उद्योगबाग पोलिसांनी मजगावमधील मारुती गल्ली येथे छापा टाकून सहदेव आण्णप्पा शेल्यागोळ (वय ५६) याला ताब्यात घेतले. तर मार्केट पोलिसांनी श्रीसाई कॉलनीतील श्रीधर रघुराम शेट्टी (वय ५७) आणि शहापूरमधील तांबिटकर गल्लीतील नसिरअहमद नौशाद बोजगार (वय ३६) या दोघांना मटका व जुगार खेळत असताना अटक केली.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कठोर कारवाई केली. सराफ कॉलनीतील लक्ष्मी टॉवरचा रहिवासी विनायक रामदास बिडीकर (वय २६), मुचंडीतील लक्ष्मी गल्लीतील सुधीर बसवानी गुंडानी (वय ३१) आणि सांबरा महादेव नगर येथील दीपक शिवाजी सोनाजी (वय ३०) यांना ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांनी गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. टिळकवाडी पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ, उद्यमबाग पोलीस उपनिरीक्षक पी. आय. गंधवगोळ, मार्केट पोलीस उपनिरीक्षक शशिकुमार कुराळे तसेच मरिहाळ पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT