बेळगाव

Belgaum News: महाविद्यालयातील चोरीचा २४ तासांत छडा

ऐगळी पोलिसांची कारवाई : दोन चोरटे जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऐगळी पोलिसांनी कोकटनूर येथील शासकीय पदवी महाविद्यालयातील चोरी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन चोरट्यांना अटक केली. दर्शन राजकुमार होनकांबळे (वय १९) व राकेश मनोहर होनकांबळे (वय २२, दोघेही रा. कोकटनूर) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, १३ मे रोजी दुपारी काही अज्ञात चोरट्यांनी महाविद्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून प्रोजेक्टर रुमममधील थिंकपॅड लॅपटॉप आणि प्रोजेक्टर असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी ऐगळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.

पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर आणि उपनिरीक्षक चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दर्शन व राकेश यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. या पथकामध्ये एएसआय एस. एच. बागोजी, कर्मचारी पी. एन. कुरी, एस. ए. शेख, डी. टी. शनवाड, के. एस. वाघमोरे आणि एस. बी. पुजारी यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT