Bribe Case Pudhari
बेळगाव

Belgaum Bribe Case : दोन हजारची लाच, लिपिकाला महागात

लोकायुक्त पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : प्रांताधिकाऱ्यांच्या न्यायालयात असलेल्या प्रकरणाला मंजुरी देण्यासाठी ३० हजाराची लाच मागत त्यापैकी २ हजार रूपये स्वीकारणाऱ्या द्वितीय दर्जा सहायकाला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. पद्माकर एस. पाटील असे संशयिताचे नाव असून मंगळवारी दुपारी लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली.

विविध प्रकारची अनेक प्रकरणे प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित असतात. ही प्रकरणे ठराविक दिवसानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या न्यायालयात निकाली काढली जातात. अशा आशयाची प्रकरणे शुभम आप्पासाहेब मधाळे (रा. कोननकेरी, ता. हुक्केरी) यांनी प्रांताधिकारी कार्यालयात सादर केली होती. शुभम हे वकिलीच्या पहिल्या वर्षात शिकत असून त्यांनी या प्रकरणांना मंजुरी देण्याची विनंती वारंवार केली होती. यावेळी उपरोक्त संशयित पद्माकर पाटील याने या कामासाठी ३० हजाराची लाच मागितली होती. लाच दिल्याशिवाय फाईल पुढे सरकणार नाही, याची सातत्याने कल्पना आल्याने शुभम यांनी या प्रकरणाची तक्रार लोकायुक्त विभागाकडे केली होती.

३० हजारपैकी मंगळवारी दोन हजाराची लाच देण्याचे ठरले. त्यानुसार कार्यालयात लाच स्वीकारताना पद्माकर पाटील रंगेहाथ सापडला. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी करून नंतर त्यांना लोकायुक्त कार्यालयाकडे नेण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लोकायुक्त विभागाचे उपअधीक्षक भरत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोविंदगौडा एस. पाटील, संगमेश होसमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT