CET  Pudhari
बेळगाव

CET exam: शहरातील 18 केंद्रांवर आज सीईटी

7,948 विद्यार्थी देणार परीक्षा : शिक्षण खात्याची तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सीईटी गुरूवार दि.23 व शुक्रवार दि.24 दरम्यान होणार आहे. शहरातील एकूण 18 केंद्रांवर सीईटी घेतली जाणार आहे. 7,948 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

विज्ञान विभागातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावासायिक अभ्यासक्रमासाठी युजीसीईटी देणे अनिवार्य आहे. गुरूवार दि.23 रोजी सकाळी 10.30 ते 11.50 फिजिक्स, दुपारी 2.30 ते 2.50 केमिस्ट्री, शुक्रवार दि.24 सकाळी 10.30 ते 11.50 गणित, दुपारी 2.30 ते 3.50 जीवशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणती अडचण येणार नाही, याची काळजी पदवीपूर्व शिक्षण खात्याने घेतली आहे, असे पदवी पूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक एम. एम. कांबळे यांनी दिली.

परीक्षा केंद्रे

लिंगराज पदवीपूर्व कॉलेज, आरएल पदवीपूर्व कॉलेज, भरतेश पदवीपूर्व कॉलेज, बेनस्मिथ पदवीपूर्व कॉलेज, गोमटेश पदवीपूर्व कॉलेज, ज्योती पदवीपूर्व कॉलेज, जीए पदवीपूर्व कॉलेज, जैन पदवीपूर्व कॉलेज, एसएस पदवीपूर्व कॉलेज, एस. जी. बाळेकुंद्री, जगदीश सौंदत्ती पदवीपूर्व कॉलेज, एक्स्पर्ट पदवीपूर्व कॉलेज, अयोध्यानगर, मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेज, गोगटे पदवीपूर्व कॉलेज, इस्लामिया पदवीपूर्व कॉलेज, अंगडी पदवीपूर्व कॉलेज, ज्योती पदवीपूर्व कॉलेज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT