Belgaum Accident Pudhari
बेळगाव

Belgaum Accident: कार-दुचाकी अपघातात चालक ठार

कित्तूरजवळील घटना : दुचाकीवरील दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कार व दुचाकीची धडक होऊन कारचालक ठार झाला तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ मंगळवारी (दि. 21) दुपारी हा अपघात झाला.

मोहम्मद इरफान मोहम्मद सादिक (वय 32 रा. खटेला, सराई-पलवाड, हरियाणा, सध्या रा. मंटूर रोड, हुबळी) असे मृताचे नाव आहे. सचिन अनिल जाधव (वय 32 रा. कुसनाळ, ता. कागवाड) व शामराव सदाशिव कुंभार (वय 32, रा. एकसंबा, ता. चिकोडी) अशी जखमींची नावे आहेत.

मोहम्मद इरफान सीएट कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. कामानिमित्त ते धारवाडहून बेळगावला येत होते. यावेळी त्यांच्या कारची सचिन व शामराव यांच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीला धडकल्यानंतर कारच्या समोरच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. त्यात मोहम्मद इरफान यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी वरील सचिन हा गंभीर जखमी झाला असून त्याला बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद कित्तूर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT