अकोळ : अकोळहून निपाणीच्या दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या युवकाचा क्रुझर धडकेत मृत्यू झाला. हालाप्पा बिराप्पा झिपरे (वय २०, रा. अकोळ) असे त्याचे नाव आहे.
हालाप्पा झिपरे हा दुचाकीवरून जात असताना ऊस भरून जाणाऱ्या ट्रॉलीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची क्रुझरला जोरदार धडक बसली. या अपघातात हालाप्पाचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.