ट्रक - दुचाकी अपघात दुचाकीचे दोन तुकडे झाले. Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : भीषण अपघातात दुचाकीचे झाले दोन तुकडे

Belgoan Accident News | हॉटेल कर्मचारी जखमी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अतिवाड फाटा (ता. बेळगाव ) येथून जवळच कोवाड मार्गावर होसूर (ता. चंदगड) नाल्याजवळ अज्ञात ट्रक व दुचाकी यांच्यात धडक होऊन दुचाकीचे दोन तुकडे झाले. यात चालक जखमी झाला असून दुचाकी वरील पाठीमागील प्रवासी यातून सुदैवाने बचावला.

याबाबत अधिक माहिती अशी की शिवणगे (ता. चंदगड) येथील किसन मारुती साळुंखे (वय 22) हा बेळगाव येथे एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून कार्यरत आहे. तो आपले काम संपवून कोवाड मार्गे आपल्या गावी जात असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून समोरचे चाक व हँडल वेगळे व दुचाकीचा इतर भाग वेगळा असा झाला. यानंतर किसन साळुंखे यांना बेळगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा याबाबत पोलिसात या घटनेची नोंद करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. अपघातानंतर अज्ञात ट्रक पसार झाल्याचे समजते. होसूर नाल्याजवळील उतार व वळण आहे. या ठिकाणी सदर अपघात झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT