Bank Services  Pudhari
बेळगाव

Bank Services : आज बँका सुरु राहणार

२८ सप्टेंबरपासून पाच दिवस बँकिंग सेवा बंद होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बे‍ळगाव : बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत बँक कर्मचाऱ्यांनी २८ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे रविवारी (ता. २७) बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. सोमवारपासूनच पुढचे तीन दिवस संप आहे, तर त्यानंतर दोन सुट्या आल्याने सलग पाच दिवस बँकांचे काम बंद राहणार आहे.

२६ सप्टेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँकांना नियमित सुटी होती. त्यानंतर संप सुरू होण्यापूर्वी ग्राहकांना सेवा उपलब्ध व्हावी, असे सांगत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकांना २७ सप्टेंबररोजी रविवारी शाखा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

इंडियन बँक्स असोसिएशनने पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः सहमती दर्शविली असली, तरी त्याला अद्याप केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत. २२ सप्टेंबररोजी झालेल्या वाटाघाटीनंतरही संप स्थगित करण्यास संघटनेने नकार दिल्याने २८ सप्टेंबरपासून तीन दिवस बँकिंग सेवा बंद होण्याची शक्यता आहे. शिवाय २ ऑक्टोबररोजी गांधी जयंती असल्याने सार्वजनिक सुटी आहे.

यूपीआय, मोबाइल बँकिंग, एटीएम सुरू

ग्राहकांसाठी सर्व बँकिंग सेवा ठप्प होणार नाहीत. यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील. एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध ठेवण्याच्या सूचना अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT