Satish Jarkiholi pudhari photo
बेळगाव

Satish Jarkiholi : 'त्या' अहवालाची अंमलबजावणी ही जबाबदारीच

मागासवर्गीयांच्या सामाजिक व आर्थिक गणनेचा अहवाल सरकारकडे प्राप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मागासवर्गीयांच्या सामाजिक व आर्थिक गणनेचा अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आहे. या अहवालाची अंमल बजावणी करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, जारकीहाळी यांनी मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांसह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. सिद्धरामय्या हे अहिंद नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना हा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मंत्री होतो. आमच्यासमोर हा अहवाल सादर करण्यात आला होता. आता मंत्री असलेल्या आम्हा सर्वांनीच त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिद्धरामय्यांशी मतभेद नाहीत

सिद्धरामय्यांशी कोणतेही मतभेद नाहीत, आपल्या घरावर आयकर विभागाची छापेमारी झाली होती, त्यावेळी सिद्धरामय्या पुत्र यतींद्र यांच्यासह घरी आले होते. त्यांनी मला धीर दिला होता. आताही ते घरी येऊ शकतात. आम्ही दोघेही एकत्र बसून चर्चा करण्याची वेळ आली, तर तेही करु, असेही जारकीहोळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT