Crime News pudhari photo
बेळगाव

Belgaum Crime: बाचीत दोन गटांत हाणामारी; दोघे जखमी

पैशाच्या व्यवहारातून वादाचा संशय : गावात पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीत झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. १४) सायंकाळी बाचीत (ता. बेळगाव) घडला. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहे. कपिल गुंजीकरला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्रसाद गणपती पाटील व इतरांनी त्याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळी बाचीत दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो असे सांगून झालेल्या पैशाच्या व्यवहारातून हा वाद झाल्याचा संशय आहे. वाद वाढत जाऊन दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत कपिल गुंजीकरसह आणखी एकजण जखमी झाल्याचे समजते. प्रसाद यांनी मित्रांना बोलावून कपिलला मारहाण केली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर गावात काही काळ तणाव होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, हाणामारीत सहभागी असलेल्या व्यक्तींच्या संख्येबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. फिर्याद दाखल झाल्यानंतर घटनेचे नेमके कारण आणि हाणामारीची पार्श्वभूमी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT