बेळगाव

Belgaum jewellery theft: चोवीस लाखाच्या दागिन्यांसह एकाला अटक

गोव्याचा चोरटा : कॅम्प पोलिसांकडून घरफोड्यांचा तपास

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : वर्षापूर्वी कॅम्प परिसरात झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी गोव्यातील एकाला अटक करुन त्याच्याकडून 160 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. याची किंमत 24 लाख रुपये होते. तंगराज सेल्वराज आचार्य (वय 40, रा. म्हापसा, गोवा) असे संशयिताचे नाव आहे.

गतवर्षी एप्रिल 2025 मध्ये गणेशपूर सरस्वतीनगरमधील शिवराम गणपती भट्ट यांनी घरफोडीची फिर्याद दिली होती. याशिवाय आठ महिन्यांपूर्वी मिलिटरी क्वॉर्टर्समधील एक घरफोडीची घटना घडली होती. या दोन्ही घटनांचा तपास कॅम्पचे निरीक्षक आनंद वणकुद्रे व त्यांच्या पथकाकडून सुरु होता. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी काही दिवसांपूर्वी तंगराज याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने उपरोक्त दोन घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आले.

त्यामुळे, त्याला ताब्यात घेऊन 160 ग्रॅमचे दागिने जप्त केले. याची किंमत पोलिसांनी 24 लाख इतकी नोंदवून घेतली आहे. खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वणकुद्रे, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, उपनिरीक्षक आर. आय. सनदी यांनी ही कारवाई केली. या कारवाईत बसवराज उज्जीनकोप्प, शिवानंद हेगडेन्नवर, वाय. एम. मुनवळ्ळी यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT