Theft File Photo
बेळगाव

Belgaum Theft : अनगोळमध्ये महिलेचे गंठण लंपास

सात तोळ्यांचा फटका; दुचाकीवरून आलेल्या चेनस्नॅचरचे कृत्य

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल ६८ ग्रॅमचे गंठण हिसडा मारून पळवून नेल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अनगोळ येथे घडली आहे. गंठणची किंमत ९ लाख १८ हजार रुपये आहे. या प्रकरणाची शुक्रवारी दुपारी टिळकवाडी पोलिसांत नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अंबिका परशुराम निकम (वय ५४, रा. शास्त्रीनगर) या अनगोळला गेल्या होत्या. अनगोळ हरी मंदिरजवळील बिग मिश्रा पेढा रेस्टॉरंटसमोरील मुख्य रस्त्यावरून त्या चालत निघालेल्या असताना समोरून आलेल्या दुचाकीवरील भामट्याने त्यांच्या गळ्यातील गंठणला हात घालून जोराने हिसडा मारला व अनगोळच्या दिशेने भरधाव निघून गेला. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत भामटा गायब झाला. या प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. फिर्यादीत त्यांनी भामट्याचे वर्णनही केले आहे. त्याने हेल्मेट घातलेले होते, शिवाय त्याच्याकडे काळ्या रंगाची बुलेट अथवा पल्सर दुचाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी दुपारी त्यांनी ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद करून घेतली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पुजेरी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT