crime 
बेळगाव

Belgaum crime: अमननगरला पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला

सहा जखमी : आठजणांवर गुन्हा, सहाजणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अमननगरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या तलवार हल्ल्यात सहाजण जखमी झाले. भाजी मार्केटमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहाजणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. या सर्वांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्ल्यातील तलवार जप्त केली.

जखमींमध्ये वली सय्यद (वय २०), मजिद राजेसाब शेख (वय ३३), कासीम रझाक शेख (वय ४०, मलीक हुसेन शेख (वय २८), इमाम मुस्ताक शेख व बाशा रझाक शेख (वय ३९) यांचा समावेश आहे. यापैकी वली सय्यद याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उर्वरीत सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये मलिक हुसेन शेख, जावेद कासीम शेख, कासीम रझाक शेख, बाशा रझाक शेख, शब्बीर दस्तगीर शेख, हुसेन कासीम शेख, इरफान कासीम शेख व अज्जू धारवाडकर यांचा समावेश आहे. यापैकी सहाजणांना अटक केली. याप्रकरणी मजीद राजेसाब शेख याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मजीद याच्या बहिणीचा मुलगा कमाल सय्यद हा तसेच हल्लेखोर कासीम शेख याची मुले ुसेन व जावेद हे येथील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये हमाली काम करतात. येथे कामावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याच वादातून मंगळवारी (दि. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास अमननगरमध्ये वादावादी झाली. यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती समजातच माळमारुतीचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तत्पूर्वी जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले होते. या प्रकरणाशी संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करुन सहाजणांना अटक केली. त्यांच्यावर खुनी हल्ल्यासह अन्य विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT