Accident file photo
बेळगाव

Belgaum Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुण ठार झाला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुण ठार झाला. मंगळवारी (दि. १२) दुपारी बाराच्या सुमारास वंटमुरी घाटात हा अपघात झाला. रुपेशकुमार गुप्ता (३०, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. काकती) असे मृताचे नाव आहे.

सदर तरुण फरशी फिटिंगचे काम करत होता. दुपारी तो महामार्ग ओलांडून पलीकडे जात होता. यावेळी संकेश्वरहून भरधाव आलेल्या वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. हे वाहन कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय या तरुणाच्या कुटुंबीय उत्तर प्रदेशहून येणार असल्याने याची अद्याप काकती पोलिसांनी नोंद करुन घेतलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT