Accident 
बेळगाव

Belgaum Accident : बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मुतगेतील घटना : बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : दुचाकीस्वार बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना चालकाने बस अचानक डाव्या बाजूला घेतल्याने बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बिराप्पा शिवाप्पा भंगी (वय ३१, रा. मेकलमर्डी, ता. बैलहोंगल) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी अडीचच्या सुमारास मुतगा येथे हा अपघात घडला.

याबाबत मारीहाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कामानिमित्त बेळगावला आलेला बिराप्पा हा आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे निघाला होता. यावेळी सीबीटी-सुळेभावी बस समोरुन निघाली होती. मुतगा गावाजवळ बिराप्पा बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक करत होता. याचा अंदाज बस चालकाला नव्हता. त्याने अचानक बस डाव्या बाजूला घेतली. यावेळी दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली सापडला. छातीवरून बसचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT