Crime News pudhari photo
बेळगाव

Belgaum Crime: २३ लाखांच्या बिस्किटांसह कारागिर फरार

शहापूर येथील घटना; कारागीर बंगालचा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : दागिने बनविण्यासाठी दिलेली दोन सोन्याची बिस्किटे घेऊन कारागीर पळून गेल्याची घटना शहापूर येथे घडली आहे. याप्रकरणी गोल्डमेकर दुकानदार मालकिणीने शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. कारागिराने ११० ग्रॅम व ५० ग्रॅम वजनाची दोन दोन बिस्किटे नेली असून त्याची किंमत २२ लाख ८८ हजार रूपये होते.

सैफुल्ला हबीबर रेहमना (मूळ रा. कंचीरारा जि. पर्गनास, प. बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. तुहीनाबेगम बादशाअली शेख (मूळ रा. जॉयनगर तारीकेश्वर कोलकाता-पं. बंगाल, सध्या रा. हरीओम अपार्टमेंट, कचेरी गल्ली, बेळगाव) यांनी मंगळवारी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, सैफुल्ला हा त्यांच्या बादशहा गोल्ड मेकर या दुकानात कामाला होता. त्याच्याकडे त्यांनी दागिने बनविण्यासाठी ११० ग्रॅम व ५० ग्रॅमची दोन बिस्किटे दिली होती. परंतु, दागिने न बनवता ३१ ऑगस्टरोजी रात्री दहाच्या सुमारास दोन्ही बिस्किटे चोरून तो फरारी झाला आहे.

पहिल्या बिस्किटची किंमत १५ लाख ७३ हजार व दुसऱ्या बिस्कीटची किंमत ७ लाख १५ हजार रूपये आहे. दोन्ही बिस्किटे मिळून २२ लाख ८८ हजारचे सोने होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शहापूर पोलिसांनी नोंद करून घेतली असून निरीक्षक एस. एस. सीमानी तपास करीत आहेत. शहापूर परिसरात दागिने बनविणारे परराज्यातील कारागीर मोठ्या प्रमाणात आहेत. परराज्यातील गोल्ड मेकर्स देखील अनेकजण आहेत. तेथील कारागिरांना येथे बोलावून घेऊन ते त्यांच्याकडून दागिने बनवून घेतात. परंतु, काही कारागीर हे दागिने घेऊन पळून जाण्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT