Belgaum News: खोदकामावेळी सापडली १४ प्राचीन सोन्याची नाणी 
बेळगाव

Belgaum News: खोदकामावेळी सापडली १४ प्राचीन सोन्याची नाणी

कामगारांनी ग्राम पंचायतीकडे केली जमा : प्रामाणिकपणाचे घडविले दर्शन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गावात विकासकामासाठी खोदकाम सुरु असताना रोहयो कामगारांना तब्बल १४ प्राचीन सोन्याची नाणी सापडल्याची घटना नुकतीच बैलहोंगल तालुक्यातील इंचलमध्ये उघडकीस आली. कामगारांनाही मजुरांनी ती तातडीने ग्राम पंचायत कार्यालयात जमा करुन प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.

इंचल गावातील बीसीएम हॉस्टेल परिसरात व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत विकासकाम सुरु आहे. या कामावेळी खोदकाम करताना कामगारांना सोन्याची नाणी आढळून आली. नाणी सापडताच त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता ती ग्राम पंचायत अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. यानंतर पंचायत विकास अधिकारी, उपतहसीलदार, ग्राम प्रशासन अधिकाऱ्यांनी संबंधित कामगारांच्या उपस्थितीत नाण्यांचा पंचनामा केला. पंचनामा व अहवाल तयार करुन सर्व १४ नाणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी तालुका पंचायत कार्यालयाकडे सुपूर्द केली.

सापडलेली प्राचीन सोन्याची नाणी नेमकी कोणत्या कालखंडातील आहेत, त्यांची किंमत किती आहे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संबंधित तज्ज्ञ, पुरातत्त्व खाते व सक्षम प्राधिकरणाकडून नाण्यांची तपासणी झाल्यानंतरच त्यांचा इतिहास आणि महत्त्व स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT