अकोळ : अकोळ परिसरात परतीचा पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. गेल्या आठ दिवसांपासून दररोज पडत असलेल्या पावसाने परिसरातील ९५ टक्के शेतकरी वर्गाच्या तंबाखू पिकावर पावसाच्या पाण्याचा परिणाम झाला आहे. तंबाखू पीक वाचवण्यासाठी शेतकरीवर्ग जीवाचे रान करत असून आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावल्यास पीक हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकात पाणी साचल्याने याचा तंबाखू वाढीवर परिणाम झाला आहे. तंबाखू पिकामध्ये विविध प्रकारची खते, औषधे दररोज परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत अकोळ पावसामुळे दणका बसलेले तंबाखू पीक. फवारून तंबाखू पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. तंबाखूचे गादी वाफे केल्यापासून पावसाची सातत्याने हजेरी आहे. ठराविक शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन गादी वाफ्यावरील तंबाखूचे तरु वाचवून तंबाखू पिकाची लावण केली. रुपयाला एक काडीप्रमाणे तंबाखूचे तरू विक्री करण्यात आले. यंदा शेतकऱ्यांना न परवडणारा तंबाखू तरूचे दर लावले. तंबाखू तरूच्या दराने आधीच कंबरडे मोडले असताना आता परतीच्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. तंबाखू लावण केल्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली नाही. शेतामधील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांनी भरमसाट पैसा खर्च केला. तरीही तणाचा नायनाट करण्यात तंबाखू पिकाची लावण केली. रुपयाला एक काडीप्रमाणे तंबाखूचे तरू विक्री करण्यात आले. यंदा शेतकऱ्यांना न शेतकऱ्यांना अपयश आले आहे. मजुरी वाढ, रासायनिक खते, औषधे महागल्याने शेतकरी त्रासला आहे. त्यातच पावसाचे थैमान सुरू झाल्याने वर्षभराचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तंबाखू पिकातून चार पैसे मिळतील ही अपेक्षा आता फोल ठरणार का, याची चिता आहे. पावसाने थैमान मांडल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.