बेळगाव : आरसीबीने पंजाब किंग्स इलेव्हनचा पराभव करून आयपीएल चषक जिंकल्याच्या आनंदात जल्लोष करताना हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अवरादी गावात घडली.
मंजुनाथ कंबार (रा. अवरादी, ता. मुडलगी) असे मृताचे नाव आहे. आरसीबीने मंगळवारी रात्री विजय मिळवल्यानंतर गावातील संगोळ्ळी रायण्णा चौकामध्ये जल्लोष करण्यासाठी तरुण जमले होते. त्यावेळी मंजुनाथही तेथे आला होता. सारेजण जल्लोष करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंजुनाथ जागीच कोसळला. त्याला काहीजणांनी तातडीने तेथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद कुलगोड पोलिस स्थानकात झाली आहे.