Murder Case  Pudhari
बेळगाव

Belgaum murder case: यात्रेत खून; 8 जणांना अटक

फरारी दोघांचा शोध सुरू : नृत्याचे निमित्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील हन्नीकेरी येथील खून प्रकरणी नेसरगी पोलिसांनी 8 जणांना अटक केली. आणखी दोघेजण फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संगनगौडा बसनगौडा पाटील (वय 50, रा. हन्नीकेरी, ता. बैलहोंगल) याचा 31 मार्च रोजी सायंकाळी खून झाल्याची घटना गावात घडली होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये देमप्पा ऊर्फ मुदकाप्पा बसलिंगाप्पा बळगन्नवर (49), मंजुनाथ मारुती बळगण्णवर (27), रूद्राप्पा चुन्नाप्पा ऊर्फ शिवनप्पा बळगण्णवर (36), विजय सुरेश बळगण्णवर (26), सुराप्पा बसलिंगाप्पा बळगण्णवर (54), सिद्धाप्पा बसाप्पा सिंगाडी (21), नागराज रामाप्पा बळगण्णवर (26) व लक्ष्मण बसवंतेप्पा बळगण्णवर (45, सर्वजण रा. हन्नीकेरी, ता. बैलहोंगल) यांचा समावेश आहे.

संगनगौडा पाटील व उपरोक्त संशयित यांच्यामध्ये आधीपासूनच वाद होता. सध्या गावातील सिद्धेश्वर यात्रा सुरू होती. यावेळी संगनगौडा हा आरोपींचे जेथे घर होते त्या समोरील रस्त्यावर थांबून नाचत होता. त्याला आधी येथे नाचू नको, असे पहिला संशयित मुदकाप्पा याने सांगितले. तरीही तो रस्त्यावर नाचतच राहिला.

यावेळी चिडलेल्या उपरोक्त सर्व संशयितांनी हातात विळा, खुरपे, लोखंडी साखळी, रॉड काठी घेऊन संगनगौडा याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संगनगौडाला बेदम मारहाण केली. यावेळी संगनगौडाचा मुलगा विनोदगौडा हा वडिलांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पुढे गेला. परंतु, हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला चढवत जखमी केले. यापैकी आठ जणांना अटक केली असून उर्वरित दोघे फरारी असून त्यांचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस प्रमुख रामराजन यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT