चिकोडी : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल व सौंदत्ती शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी वाहून गेल्या असून, वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरात सोमवारी (दि.९) दुपारी अचानक झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही मिनिटांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते, तर सखल भागात पाणी साचल्याने रहिवासी अडचणीत सापडले. पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे शहरातील अनेक वस्त्या आणि मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. हरळय्या कॉलनीतील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. घरातील पाणी बादल्या आणि भांड्यांच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी महिला व कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली.
बस स्थानकाजवळ पाण्याचा प्रचंड प्रवाह
बस स्थानकाजवळ पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, तिथे पार्क केलेल्या काही दुचाकी पाण्याच्या वेगात वाहून गेल्या. तसेच तटवटी येथील दुचाकी शो-रूमचा परिसरही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
भाविकांनाही फटका
अधिक मास असल्यामुळे सौंदती यल्लम्मा (रेणुका) देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यांनाही ढगफुटीसदृश पावसाचा फटका बसला