बेळगाव : शहरातील टंचाईग्रस्त प्रभागांत सध्या एलअॅंडटी कंपनीकडून २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
एखाद्या भागात टँकरची आवश्यकता भासल्यास स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा. नगरसेवकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. राकसकोप जलाशयाच्या मृतसाठ्यातून २० ते २५ तर हिडकलमधून ५५ एमएलडी पाण्याचा उपसा सुरुआहे.
शहराला रोज १०५ ते ११० एमएलडी पाण्याची गरज आहे. पण, या तुलनेत दोन्ही जलाशयांतून पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे, शहरात पाणी टंचाई उद्भवली आहे. जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राकसकोपमध्ये शिल्लक आहे.