Accident file photo
बेळगाव

Belgaum Accident: मामा, भाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्युमुखी

पत्नीच्या माहेरी जाताना दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पत्नीच्या गावी निघालेल्या तरुणाचे भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो व त्याचा १९ वर्षीय भाचा जागीच ठार झाले. गोकाक तालुक्यातील पंचनायकनहट्टी क्रॉस-दुरदुंडेश्वर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला.

इराप्पा मल्लाप्पा नंदीगौडर (वय ३२, रा. पंचनायकनहट्टी, ता. गोकाक) व मल्लाप्पा महादेवाप्पा पाटील ऊर्फ गौडर (वय १९, रा. पंचनायकनहट्टी, ता. गोकाक) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, इराप्पा हा ट्रॅक्टर घेऊन पत्नीच्या गावी निघाला होता. सोबत त्याने भाचा मल्लाप्पा यालाही घेतले होते. दोघेजण उपरोक्त मार्गावरून शेतातील रस्त्याने निघाले होते.

भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने एका वळणावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी झाला. यामध्ये दोघेही ट्रॅक्टरखाली सापडून जागीच ठार झाले. या घटनेची गोकाक ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT