बेळगाव

Belgaum crime: तिघा चोरट्यांकडून बारा मोबाईल, दुचाकी जप्त

तिघा चोरट्यांकडून चोरीचे बारा मोबाईल व एक दुचाकी जप्त केली. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तिघा चोरट्यांकडून चोरीचे बारा मोबाईल व एक दुचाकी जप्त केली. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये शंकर भीमा अडीण्‍णवर (रा. यमकनमर्डी आरसी), परशुराम कल्लाप्पा शिरणगी (दादबानहट्टी) व परशुराम भरमाप्पा पांढरे (रा. चिक्कलदिन्नी) यांचा समावेश आहे.

हुक्केरी तालुक्यातील हंचिनाळ येथील एकाची दुचाकी चोरीला गेल्याची नोंद यमकनमर्डी पोलिसांत झाली होती. त्या आधारे तपास करताना पोलिसांनी उपरोक्त तिघांना अटक केली. याशिवाय सीईआयर पोर्टलमध्ये मोबाईल चोरीची नोंद झाली होती. असे १२ मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून ते न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधीत मालकांना परत करण्यात आले.

यमकमर्डीचे निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक बी. के. पाटील व त्यांचे सहकारी वाय. डी. गुंजगी, जे. बी. नागन्नवर, पी. के. किळीकेतर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT