बेळगाव

Belgaum jewellery seizure: चोरीचे ४५ लाखांचे दागिने जप्त

सदर संशयिताने काही दिवसांपूर्वी शहापूर भारतनगरमधील एका घराचे कुलूप तोडून सोन्याची बिस्कीटे पळवली होती

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : चोरीचे ४५ लाखांचे सुमारे ३०० ग्रॅमचे दागिने शहापूर पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी मिंटू ऊर्फ चिंटू कुटी बिस्वास (वय ५२, रा. टिळकनगर, पश्चिम दिल्ली) याला अटक केली.

सदर संशयिताने काही दिवसांपूर्वी शहापूर भारतनगरमधील एका घराचे कुलूप तोडून सोन्याची बिस्कीटे पळवली होती. याचा शहापूर पोलिसांकडून शोध सुरु होता. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून २९४ ग्रॅमचे सोने, दुचाकी असा तब्बल ४५ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शहापूरचे पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT