hanging case Pudhari News Network
बेळगाव

Belgaum News: सोनट्टीत एकाचा मंदिरातच गळफास

पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून मद्याच्या आहारी गेलेल्या एकाने चक्क मंदिरात गळफास घेऊन जीवन संपवले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून मद्याच्या आहारी गेलेल्या एकाने चक्क मंदिरात गळफास घेऊन जीवन संपवले. सोनट्टीत (ता. बेळगाव)रविवारी (दि. ७) ही घटना उघडकीस आली. सिद्धाप्पा यल्लाप्पा मचंडी (वय ५०, रा. सोनट्टी, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, काही वर्षांपूर्वी सिद्धाप्पा यांना पत्नीने सोडून दिले आहे. तेव्हापासून ते मानसिक नैराश्यात होते. यातूनच त्यांना मद्याचे व्यसन लागले होते. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या सुमारास ते गावातील लगमव्वा मंदिरात गेले. मंदिराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर टी-शर्टच्या साहाय्याने मंदिरातील घंटेच्या हुकाला गळफास घेऊन जीवन संपवले.

रविवारी सकाळी मंदिर उघडताना हा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. काकती पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT