बेळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस आयुक्तालयाने ५८ लाखांचे तर, जिल्हा पोलीस मुख्यालयाने १० लाखांचेअंमली पदार्थ जप्त केले होते. सौंदत्ती तालुक्यातील हारूगोप्प येथे गुरूवारी हे पदार्थ नष्ट करण्यात आले.
पोलीस आयुक्तालयाने एकूण १५ प्रकरणांमध्ये अंमली पदार्थ जप्त केले होते. यामध्ये २४ कि. गांजा, १२० ग्रॅम हेरॉईन, हशीश होते. जिल्हा पोलीस मुख्यालयाने १४ प्रकरणांमध्ये २२ किलो गांजा जप्त केला होता. सर्व अंमली पदार्थ कर्नाटक प्रदूषण नियंत्रण विभाग, अंमलीपदार्थ नष्ट कृती समिती, औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष नष्ट करण्यात आले. ही कार्यवाही बेळगाव ग्रीन एन्व्हॉयरमेंट मॅनेजमेंट हारुगोप्प (ता. सौंदत्ती) येथे करण्यात आली.
आयुक्तालयातील रहदारी व गुन्हे विभागाचे डीसीपी निरंजनराजे अर्स व त्यांचे सहकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस मुख्यायाच्यावतीने पोलीस प्रमुख के. रामराजन, गोकाकचे उपअधीक्षक रवी नायक व अन्य अधिकारी उपस्थित होते.