KYC Fraud Pudhari
बेळगाव

Belgaum KYC fraud: केवायसीच्या नावाखाली पावणेदोन लाखांचा गंडा

केवायसी अपडेटच्या नावाखाली एकाला पावणेदोन लाखांचा गंडा घातल्याची नोंद शहर सीईएन पोलिसांत झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : केवायसी अपडेटच्या नावाखाली एकाला पावणेदोन लाखांचा गंडा घातल्याची नोंद शहर सीईएन पोलिसांत झाली आहे. या प्रकरणी बसव कॉलनी येथील विजयकुमार नामक तरुणाने फिर्याद दिली आहे.

विजयकुमारने फिर्यादीत म्हटले आहे की, २६ एप्रिल रोजी आपल्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. एसबीआय केवायसी अपडेट करायची आहे, असे सांगत एक एपीके ॲप पाठवले. त्यावर क्लिक करताच सदर व्यक्तीच्या आयडीएफसी बँकेत असलेल्या खात्यावरून तब्बल १ लाख ७६ हजारांची रक्कम कमी झाली. हा प्रकार २७ ते २८ एप्रिल दरम्यान घडला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

आणखी एका तरुणाचे व्हॉटस्‌ॲप हॅक

जितेश नामक तरुणालाही एसबीआय केवायसी अपडेट असा शनिवारी मेसेज आला. त्यावर क्लिक करताच त्याच्या बँक खात्यावरून ११ रुपयांची रोकड वर्ग करून घेतली. त्यामुळे आपल्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फाईल विशेषतः एपीके फाईल्स ओपन करू नये, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT