molestation file photo
बेळगाव

Belgaum Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार; एकावर गुन्हा

नेहरुनगर परिसरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अनिल कल्लाप्पा सण्णकिण्णावर (मूळ रा. रायबाग, सध्या रा. दासरवाडी, ता. बेळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला. सदर तरुणाविरोधात तालुक्यातील व सध्या नेहरुनगर परिसरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

तिने म्हटले आहे की, २८ फेब्रुवारी रोजी आपल्या हॉस्टेलसमोर येऊन सदर तरुणाने बाहेर बोलावून घेतले. बाहेर जाऊया चल म्हणून जबरदस्ती करु लागला. मी नकार दिला असता माझा मोबाईल काढून घेत मित्राला भेटून येऊ या, असे सांगत जबरदस्तीने लॉजवर नेले.

यावेळी आपण विरोध केला असता आपण लग्न करणार आहोत, असे सांगितले. यानंतर असाच प्रकार पुन्हा केला. त्यामुळे या तरुणीने बुधवारी रात्री एपीएमसी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक उस्मान आवटी तपास करीतआहेत.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT