Crime News Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Crime: जुगार अड्ड्यांवर छापे; २६ जणांना अटक

काकती, एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीत कारवाई : १.६० लाखांचा मुद्देमाल जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव पोलिसांनी जुगाराविरोधात विशेष मोहीम राबवत काकती आणि एपीएमसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून २६ जणांना अटक केली. या कारवाईत १ लाख ६० हजार रुपये, पत्ते व अन्य साहित्य जप्‍त केले.

काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होनगा औद्योगिक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पीएसआय मृत्युंजयमठ व त्यांच्या पथकाने छापा टाकून २० जणांना ताब्यात घेतले. यासीन मोहम्मदहुसैन तासीलदार (वय ३७), अरिफ मोहम्मद गौस शहापुरी (३६), सर्फराज मोहम्मद गौस शहापुरी (२८), फैजान अल्ताफ मुजावर (२५), शानूर मुचंडी (२५), अरिफ अझरुद्दीन मुल्ला (३८), सुनील शिवाजी अष्टेकर (३५), वसीम मुजावर (३६), अल्ताफ मुजावर (४५), दस्तगीर मुल्ला (३४), आरिफ काकतीकर (३४) अतिक रफीक सौदागर (२८), प्रकाश शंकर बन्ने (३२, सर्व रा. काकती), गणपती रामप्पा केंचवगोळ (४६, रा. बस्सापूर, ता. हुक्केरी),

सिराज अब्दुलगणी काझी (३४, रा. गांधीनगर बेळगाव), सकलिन हरूण तंबाखवाले (३२, रा. उज्‍ज्वल नगर बेळगाव), जहांगीर अब्दुल नायक (४७, बस्सापूर, ता. हुक्केरी), दस्तगीर नूरअहमद देसाई (३४, रा. शिरूर ता. हुक्केरी), महंमद तय्यम जत्ती (४०, रा. मारुती नगर, बेळगाव), मन्सूर दाऊदसाब बागवान (४१, रा. उज्‍ज्वल नगर) या संशयितांकडून रोख रक्कम, जुगार साहित्य असा एकूण १ लाख ६० हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून नागेश चंद्रू पम्मार (वय ३६ ), विनोद शंकर पम्मार (३८), रवी पम्मार (४२, तिघेही रा. कलमठ तांडा, सध्या रा. शाहूनगर), प्रकाश लमाणी (३५, रा. विजापूर, सध्या रा .शाहूनगर), रवी रामापा कारबरी (३६, रा. रुक्मिणीनगर बेळगाव), नागेश दारासिंग राठोड (३७, रा. बन्नूर तांडा, सध्या रा. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या संशयितांकडून रोख रक्कम व पत्ते जप्त करण्यात आले असून, एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT