Belgaum Project: बेळगावच्या प्रकल्पाची ‌‘एआय परिषदे‌’त दखल Pudhari
बेळगाव

Belgaum Project: बेळगावच्या प्रकल्पाची ‌‘एआय परिषदे‌’त दखल

‘एसजीबीआयटी‌’च्या विद्यार्थ्यांचा उपक्रम : 15 निवडक प्रकल्पांमध्ये समावेश

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगावमधील दोन तरुण संशोधकांनी त्यांच्या ऊर्जा प्रकल्पाद्वारे राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. ‌‘बायोलूप‌’ असे या प्रकल्पाचे नाव असून तो वातावरणातील कार्बन डायऑक्साइड थेट शोषून त्यापासून जैवइंधन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहाव्या सत्रातील संगणकशास्त्राचे विद्यार्थी प्राकुल हिरेमठ आणि हर्षित हिरेमठ हे ‌‘स्टार्टअप कर्नाटक मेन 2.0‌’ उपक्रमांतर्गत हा प्रकल्प विकसित करत आहेत.

अलीकडेच भारत मंडपममध्ये आयोजित ‌‘इंडिया एआय इम्पॅक्ट परिषद 2026‌’ मध्ये त्यांच्या कार्याचे प्रदर्शन करण्यात आले. जगभरातून प्राप्त झालेल्या 72 प्रवेशिकांपैकी ‌‘बायोलूप‌’ची निवड इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था यांच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या 15 निवडक ‌‘ए आय एनर्जी‌’ केस स्टडीजमध्ये करण्यात आली.

बायोलूप कार्बन डायऑक्साइड शोषण्यासाठी आणि त्याचे बायोफ्युएल व हायड्रोजनमध्ये रुपांतर करण्यासाठी ‌‘अल्गी-आधारित‌’ (शेवाळ) फोटोबायोरिक्टर्सचा वापर करते. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेले लो-कॉस्ट एज एआय तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान क्लाउडवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे काम करु शकते. ज्यामुळे लहान स्तरावर आणि विकेंद्रित पद्धतीने स्वच्छ इंधन निर्मिती शक्य होते. एआय-चलित मॉनिटरिंगद्वारे फोटोबायोरिक्टर्स स्थिर करु, या टीमने पायलट-स्केल पडताळणी दरम्यान इंधनाचे उत्पन्न, हायड्रोजन उत्पादन आणि ऊर्जेची कार्यक्षमता यात सुधारणा दर्शविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT