Chikodi Pogatyanti village car on fire incident
चिकोडी : संपत्तीच्या वादातून पतीच्या कारला चक्क पत्नीने आग लावून पेटवल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानटी या गावात घडली आहे. ही घटना चिकोडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.
पती शिवनगौडा पाटील व पत्नी सावित्री पाटील यांच्यामध्ये संपत्तीवरून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. एकाच घरात राहत असताना देखील संपत्ती व पैशासाठी पती-पत्नीमध्ये वाद सुरू आहेत. दोघांच्या भांडणामध्ये पत्नीने रागाच्या भरात पेट्रोल टाकून पत्नी सावित्री पाटील हिने पतीची इको कार पेटवून दिली. कारने पेट घेताच वाचवा वाचवा, असे पतीने मदतीसाठी हाक दिली. सदर घटना चिकोडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.