Jewellery Theft (Pudhari Photo)
बेळगाव

Belgaum jewellery theft: पिरनवाडीला सराफी दुकानातून दागिने पळवले

सराफी दुकानात घुसलेल्या तिघा भामट्यांनी दुकान मालकाचे लक्ष विचलित करून २१ ग्रॅमचे दोन नेकलेस हातोहात पळवून नेले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सराफी दुकानात घुसलेल्या तिघा भामट्यांनी दुकान मालकाचे लक्ष विचलित करून २१ ग्रॅमचे दोन नेकलेस हातोहात पळवून नेले. याची किंमत ३ लाखांवर होते. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास पिरनवाडी येथे ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, पिरनवाडी येथील एका सराफी दुकानाजवळ एकाच दुचाकीवरून आलेले तिघेजण गेले. यापैकी एकटा उतरून दुकानात गेला तर अन्य दोघे दुचाकीवरच बसून राहिले. जो उतरला होता तो सराफी दुकानात जाऊन नेकलेस घ्यायचे आहेत, असे सांगितले. दुकानदाराने त्याच्या समोर १० ग्रॅमचा व ११ ग्रॅमचा असे दोन नेकलेस ठेवले. आणखी एक दाखवा, असे या भामट्याने सांगितले.

यावेळी तिसरा नेकलेस काढण्यासाठी दुकानमालक थोडेसे वळताच हातात असलेले दोन्ही नेकलेस घेऊन भामटा पळून गेला. जे दोघे दुचाकीवर बसले होते त्यांच्यासमवेत भरधाव निघून गेला. याप्रकरणी दुकान मालक वृषभ शिरोडकर यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. याची पोलिसांनी नोंद करून घेतली असून सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे काम सुरू आहे. उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT