बसवराज होरट्टीं 
बेळगाव

Belagavi monsoon session: बेळगावात पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये?

मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याची सभापती बसवराज होरट्टींची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा प्रथमच बेळगावात भरविण्याचा विचार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता असल्याची माहिती विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली. या प्रस्तावाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही संमती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

बेळगावात २००६ पासून हिवाळी अधिवेशन होते. आता बेळगावात पावसाळी अधिवेशनही घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. यामध्ये सभापती होरट्टी यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती दिल्याने तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. बेळगावात दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. अधिवेशनाचे पंधरा दिवस कामकाज बेळगावात चालते. उर्वरित कामकाज बंगळूरमध्ये होते. परंतु, यावर्षी बदल करत पावसाळी अधिवेशन भरविण्यात येणार आहे.

याबाबत होरट्टी म्हणाले, राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी संमंती दिली आहे. बेळगावात पावसाळी अधिवेशन झाल्यास अतिवृष्टी आणि दुष्काळाबाबत सभागृहात प्रदीर्घ होऊ शकेल. उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकातील समस्यांबाबत चर्चा करण्यात येईल. मागील दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या समस्याबाबत निर्णय घेणे सुलभ जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT