murder case Pudhari File
बेळगाव

Murder case: हिरेनंदीहळ्ळीत एकाचा निर्घृण खून

मक्याच्या शेतात आढळला मृतदेह; धारदार शस्त्रांनी हल्ला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गुप्तांग कापून निर्घृण खून केल्याची घटना कित्तूर तालुक्यातील हिरेनंदीहळ्ळी गावात उघडकीस आली आहे. कलमेश कोटी (वय 50, रा. हिरेनंदीहळ्ळी) शनिवार, दि. 21 रोजी गावाजवळील मक्याच्या शेतात सडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीचा खून चार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. मक्याच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. शेतकऱ्यांना काहीतरी कुजल्याचा वास आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पाहणी केली असता अनोळखीचा मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यानंतर याची माहिती कित्तूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता, त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. हल्लेखोरांनी कलमेश याचा खून करून त्याचे गुप्तांग कापले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कलमेश हा तुमकूर येथे होमकेअर म्हणून काम करत होता. दहा दिवसांपूर्वी तो गावी परतला. तो आईसोबत राहत होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी पत्नीने त्याला सोडले होते. त्यामुळे तो तुमकुर येथे कामासाठी गेला होता.

पोलिसांनी याप्रकरणी आर्थिक व्यवहार, मालमत्ता व वैयक्तिक वादाची शक्यता वर्तवली आहे. त्याचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याची पत्नी आणि मुलगा गावात परतले आहेत. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन यांना मिळताच त्यांनी शनिवारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कित्तूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT