बेळगाव

Belgaum News: बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज नाही

देखभाल व दुरुस्ती कामाचा परिणाम : हेस्कॉमकडून सहकार्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हेस्कामने देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रविवारी (दि. 9) सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

बेळगाव तालुक्यात हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अलतगा, आंबेवाडी, हलगा, बस्तवाड, शिगनमट्टी, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मीनगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कमकारट्टी, मुत्न्याळ, विरसनकोप्प, अरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी, गजपती, अंकलगी, हुलीकवी, केके कोप्प, कलारकोप्प, सिद्धनहळ्ळी, बडेकोळमठ, हलगीमर्डी, नागेनट्टी, नागेरहाळ, बडस, नंदीहळ्ळी, कुकडोळ, दत्तनगर, हावळनगर, गोडसे कॉलनी, ओंकारनगर, मच्छे, झाडशहापूर, देसूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, किणये, कर्ले, संतीबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, रंगदोळी, पिरणवाडी, खादरवाडी, मार्कंडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडे, हुंच्यानट्टी, अशोक आयर्न प्लांट या भागात रविवारी दिवसभर वीज नसेल.

खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी, गाडीकोप्प, पारिश्वाड, उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, मुडवी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमणी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, हळे आणि होसा हुळंद या गावातील वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. ग्राहकानी सहकार्य करावेे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT