Murder Case  Pudhari
बेळगाव

Belgaum murder case: हुंचेनट्टीत मजगावच्या तरुणाचा खून

बेळगाव तालुक्यातील हुंचेनट्टीतील रामेश्वर नगर येथे मजगाव येथील एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हुंचेनट्टीतील रामेश्वर नगर येथे मजगाव येथील एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली. राहुल तिप्पाण्णा तळवार (वय २३, रा. तानाजी गल्ली, मजगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे मजगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.

राहुल हा चन्नम्मा नगर येथील एका मेडिकल दुकानात काम करत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास काही तरुणांनी त्याला बोलावून नेल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर हुंचेनट्टी परिसरात त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. सात ते आठ जणांनी मिळून हा खून केल्याचा संशय आहे. ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT