Robbery Pudhari
बेळगाव

Belgaum Jewellery Theft: घर फोडून चार तोळे दागिने लंपास

मच्छे येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मच्छे येथील बंद घर फोडून चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये लंपास केल्याची घटना रविवारी (दि. १४) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मच्छे येथील महादेव गल्ली-गंगा गल्ली परिसरातील रहिवासी राजू जायाप्पा बोगार यांच्या घरात ही चोरीची घटना घडली आहे. बोगार यांची पत्नी घराला कुलूप लावून माहेरी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी शनिवारी (दि. १३) रात्री कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सुमारे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा नेकलेस तसेच १० हजार रुपये असा ऐवज लंपास केला.

रविवारी सकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराचे कुलूप व कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. घरातील साहित्‍याची पाहणी केली असता, चोरी झाल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. यानंतर तातडीने बेळगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT