Heroin smuggling pudhari photo
बेळगाव

Belagavi Heroin Seizure: चौदा हजारचे हेरॉईन जप्त; चौघांवर गुन्हा

शहरातील शिवाजीनगर भागात बारा हजार रुपयांचे हेरॉईन बुधवारी (दि. १७) जप्त करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील शिवाजीनगर भागात बारा हजार रुपयांचे हेरॉईन बुधवारी (दि. १७) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास शिवाजीनगर तिसरा क्रॉस येथे तिघे संशयित अमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला असता तिघेजण दोन ग्रॅम हेरॉईनसह सापडले. याची किंमत चार हजार रुपये होते. या प्रकरणी सत्यम सुहास हुद्दार (वय २४, रा. अळवण गल्ली, शहापूर), इर्शादअहंमद सलाउद्दिन ताशिलदार (वय २९, रा. बाबले गल्ली, अनगोळ) व सिद्धार्थ दत्ता कदम (वय २४, रा. पहिला मेन, तिसरा क्रॉस, शिवाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

आणखी एका घटनेत सुजल कृष्णनाथ पाटील (वय १९, रा. शेट्टी गल्ली, बेळगाव) याला अटक केली. त्याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम हेरॉईन जप्त केले. या पाचजणांवर मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT