Drug Case  Pudhari
बेळगाव

Belgaum heroin case: हेरॉईनप्रकरणी चौघांवर गुन्हा

दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हेरॉईन नामक अमली पदार्थ विक्रीप्रकरणी मार्केट पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. महंमदशाहीद अब्दुलहमीद मुल्ला (वय 31, रा. आंबेडकरनगर, काकती) व शकुर अब्दुल खान (वय 27, रा. अजयनगर, बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सात हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम हेरॉईन जप्त केले.

उपरोक्त संशयित मल्लिकार्जुननगर येथील रेणुका मंदिराजवळ खुल्या जागेत अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मार्केटचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व अन्य सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला उपरोक्त दोघेजण सापडले. या दोघांनी तबरेज बसापुरी व अरबाज मुस्ताक (दोघेही रा. रुक्मिणीनगर) यांच्याकडून अमली पदार्थ घेतल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT