Handiganur Lakshmi Yatra 
बेळगाव

Handiganur Lakshmi Yatra: हंदिगनुरात लक्ष्मी यात्रेची लगबग

ग्रामस्थांकडून जोरदार तयारी : आठ दिवसांवर यात्रा ठेपल्याने धांदल, 37 फुटी रथ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हंदिगनूरमधील (ता. बेळगाव) लक्ष्मीदेवीची यात्रा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. यात्रा उत्सव कमिटीसह ग्रामस्थही तयारीच्या कामात गुंतले आहेत. यात्रेसाठी तयार करण्यात येत असलेल्या रथाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात्रा जसजशी जवळ येत आहे तसतसे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.

तब्बल 58 वर्षांनंतर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा 14 ते 22 एप्रिल दरम्यान होणार आहे. यासाठी 37 फूट उंच रथ तयार केला जात आहे. रथाच्या सजावटीबरोबर रंगरंगोटीचे कामे जोमाने सुरू आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात विविध विकासकामे राबवून काँक्रीटचे रस्ते तयार केले आहेत. यात्रा काळात कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिले आहे.

लक्ष्मी उत्सव कमिटीतर्फे रथ जोडणीबरोबर लक्ष्मी गदगेला बसणार आहे, त्याठिकाणचे सपाटीकरण केले आहे. शिवाय भव्य मंडप उभारला जात आहे. त्याचबरोबर बेळगाव -हंदिगनूर, हंदिगनूर- म्हाळेनट्टी, हंदिगनूर- बोडकेनहट्टी, हंदिगनूर-मण्णीकेरी मार्गावर पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गावच्या बाहेरून मार्ग काढण्यात आले आहेत. यात्रा काळात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी विषेश नियोजन केले जात असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे.

लक्ष्मी यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कल्लाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाबू तळवार, विजय कांबळे आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT