बेळगाव : हलगा येथे एका शेडमध्ये ठेवलेले पावणेचार लाख रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. अबकारी खात्याने मंगळवारी (दि. 3) ही कारवाई केली. या प्रकरणी शेडमालक अरुण राजू वाघमोरे (वय 21, रा. मुत्नाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगपंचमीनिमित्त हलग्याजवळील एका शेडमध्ये मोठा मद्यसाठा ठेवल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली. हलग्याहून मुत्नाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गालगतच्या शेडमध्ये मद्यसाठा असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे तेथे जाऊन छापा टाकला असता गोवा बनावटीचे मद्य व बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. हे मद्य 535 लिटर असून याची किंमत 3 लाख 77 हजार रुपये होते.
अबकारी खात्याचे उपायुक्त जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रवी मुरगोड, निरीक्षक दुंडाप्पा हक्की, सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा छापा टाकला.