Gambling Pudhari
बेळगाव

Belgaum gambling case: बळ्ळारी नाल्याजवळ जुगार; आठजणांवर गुन्हा

शहापूर पोलिसांची कारवाई; ४७ हजार रुपयांची रक्कम जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बळ्ळारी नाला परिसरात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या आठजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापैकी सातजणांना ताब्यात घेतले असून एकजण फरारी आहे. या सर्वांकडून ४७ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. रविवारी (दि. ३१) रात्री शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये धनराज ऊर्फ बंटू महादेव सुतार (वय २२, रा. महाद्वार रोड), नजीर अजीज पठाण (५०, रा. शिवाजीनगर), श्रीधर जोतिबा लोहार (रा. उप्पार गल्ली, खासबाग), राहुल मनोहर हलगेकर (४४, रा. पाटील गल्ली, बेळगाव), नागप्पा सिद्रायी नाईक (६७, रा. लक्ष्मीनगर, काकती), विनायक गिरीधर दरमुडे (३९, रा. कुंतीनगर, खासबाग), विश्वनाथ रवी गोटडकी (२९, रा. भांदूर गल्ली) व शशी सुब्रमणी जालगार (३५, रा. कपिलेश्वर कॉलनी) यांचा समावेश आहे.

हे सर्वजण अंदर-बाहर जुगार खेळत असल्याची माहिती शहापूरचे उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता आठजण जुगार खेळताना आढळून आले. यापैकी सातजण सापडले तर शशी जालगार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या सर्वांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून ४७ हजार २०० रुपये जप्त केले. पुढील तपास उपनिरीक्षक पुजारी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT