accident file photo
बेळगाव

Belgaum accident: कारच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार

हलग्याजवळ अपघात; मृत बसवण कुडचीचे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : समोरुन निघालेल्या दुचाकीला भरधाव कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार वृद्ध जागीच ठार झाले. अरुण कुमार नागप्पा पाटील (वय ६२, रा. तानाजी गल्ली, बसवण कुडची) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास हलग्याजवळील अशोक लेलँड शोरुमजवळ हा अपघात घडला. याबाबत अधिक माहिती अशी, मृत अरुणकुमार हे दुचाकीवरून महामार्गावरून निघाले होते.

यावेळी शिवय्या महादेवय्या होसूरमठ हे बेळगावहून धारवाडकडे त्यांच्या कारने (केए २२ एमडी ३०८४) निघाले होते. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची समोरुन निघालेल्या दुचाकीला जोराची धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार अरुणकुमार रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.

याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांत नोंद झाली असून आहे. कारचालकावर गुन्हा दाखल करून कार जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. तपास करीत आहेत.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT